Crime: सोसायटीत नवीन राहायला आलेल्या व्यक्तीला नाव आणि फ्लॅट क्रमांक विचारल्याने राग झाला अनावर, रागात सुरक्षा रक्षकाला अमानुष मारहाण, पहा व्हिडीओ
मारहाणीमुळे त्याच्या डोळ्यांना आणि कानाला दुखापत झाली असून त्याला एका कानाने कमी ऐकू येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
राजनगर एक्स्टेंशनच्या पॅराडाईज सोसायटीत नवीन राहायला आलेल्या एका व्यक्तीला तेथे तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकाने त्याचे नाव आणि फ्लॅट क्रमांक विचारला. याचा राग आल्याने त्या व्यक्तीने गार्डला शिवीगाळ करत मारहाणही केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. याप्रकरणी गार्डने आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मारहाणीमुळे त्याच्या डोळ्यांना आणि कानाला दुखापत झाली असून त्याला एका कानाने कमी ऐकू येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी नंदग्राम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कारवाई सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)