Uttarakhand Fire: मसुरी जवळील हॉटेलला भीषण आग, कोणतीही जीवितहानी नाही; घटना कॅमेरात कैद

मसुरी (Mussoorie) कॅमल बॅक रोडवर असलेल्या एका हॉटेलला रविवारी सकाळी भीषण आग (Fire) लागली.

Uttarakhand Fire

Uttarakhand Fire: मसुरी (Mussoorie) कॅमल बॅक रोडवर असलेल्या एका हॉटेलला रविवारी सकाळी भीषण आग (Fire) लागली. मसुरी पोलिस स्टेशनचे एसएचओ शंकर सिंह बिश्त यांनी दिलेल्या माहितीनुसार, आगीत दोन वाहने जळून खाक झाली. मसुरी कॅमल रोडवर असलेल्या रिंग हॉटेलला आग लागल्याने मोठी खळबळ उडाली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. कोणतीही जीवितहानी झाली नाही. अशी माहिती पोलीसांकडून मिळाली आहे. अग्निशमन दल आगीवर नियत्रंण मिळवण्यास प्रयत्न करत आहेत. हॉटेलचे नुतनीकरण काम चालू असल्याने हॉटेल रिकामी होते.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)