Uttar Pradesh: उत्तर प्रदेशमध्ये धामपूर शहरात होळी उत्सवादरम्यान मुस्लिम कुटुंबाचा छळ; जबरदस्तीने रंग लावतानाचा व्हिडिओ व्हायरल

उत्तर प्रदेशच्या बिजनौर जिल्ह्यातील धामपूर शहरात काही हुल्लडबाजांनी मुस्लिम कुटुंबाला अडवत जबपदस्तीने रंग लावल्याची आणि त्यांच्यावर पाणी फेकल्याची घटना समोर आली आहे. घटनेचा व्हिडीओ व्हायरल होताच पोलीसांनी कारवाई सुरू केली आहे.

Photo Credit -Twitter

Uttar Pradesh: देशभरात होळीचा (Holi )सण उत्साहात साजरा होतोय. मात्र, या दरम्यान काही हुल्लडबाज सणाला गालबोट लावण्याची कामे करत आहेत. धामपूर शहरात एका टोळक्याने दुचाकीवरून जात असलेल्या एका मुस्लिम कुटुंबाची (Muslim Family) अडवणूक केली. त्यानंतर त्यातील काही तरूणांनी त्यांची दुचाकी बंद करत, तिघांवर पाणी फेकले. इसमाच्या तोंडाला रंग (Colors) लावला. मागे बसलेल्या महिलेलाही इच्छेविरूद्ध रंग लावला. त्यावर पीडित कुटुंबाने निषेध व्यक्त केला असता, प्रत्युत्तरात गटाने ‘हर हर महादेव’ आणि ‘जय श्री राम’च्या घोषणा दिल्या. सध्या पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.(हेही वाचा : Holi 2024 : लोकल ट्रेन-बसवर रंगांचे फुगे, पिचकारी मारणाऱ्यांनो आवरा स्वत:ला; प्रशासन गुन्हा दाखल करण्याच्या तयारीत)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now