Mission Chandrayaan-3: चांद्रयान-3 च्या प्रक्षेपणप्रसंगी इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि म्हणाले.......
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ची बहुप्रतिक्षित मोहीम शुक्रवारी प्रक्षेपणासाठी सज्ज झाली आहे.
Mission Chandrayaan-3: भारताची चांद्रयान 3 मोहीम चालू होणार आहे. उद्या 14 जुलै रोजी दुपारी 2:35 वाजता भारत तिसरी चंद्र मोहीम ‘चांद्रयान-3’ लाँच करण्यासाठी सज्ज आहे. त्यामुळे वैज्ञानिक पुर्व तयारीला लागले आहे. दरम्यान चांद्रयान-3 च्या प्रक्षेपणप्रसंगी इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ (S Somnath) यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, मी प्रार्थना करतो की सर्वकाही चांगले होईल आणि ते 23 ऑगस्टपासून कोणत्याही दिवशी चंद्रावर उतरेल. ANI ने या संदर्भात व्हिडिओ पोस्ट केला आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)