Indian Army: बेपत्ता भारतीय लष्कर जवान जम्मू-काश्मीर पोलिसांना जिवंत सापडला, पुढील वैद्यकिय तपासणी सुरु
भारतीय जवान लष्कर अखेर काश्मीर मध्ये सापडले. पोलीसांची शोध मोहिम संपली आहे.
Indian Army: बेपत्ता भारतीय लष्कराचा जवान जावेद अहमद वानी जम्मू-काश्मीर पोलिसांनी जिवंत सापडला, वैद्यकीय तपासणीसाठी नेला. गेल्या आठवड्यात जम्मू आणि काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यातून बेपत्ता झालेला एक लष्करी जवान सापडला आहे, अशी माहिती पोलिसांनी गुरुवारी दिली.लडाखमध्ये तैनात जावेद अहमद वानी हे शनिवारी त्यांच्या मूळ कुलगाम जिल्ह्यातून सुट्टीवर असताना बेपत्ता झाले."बेपत्ता लष्करी जवानाला कुलगाम पोलिसांनी परत मिळवले आहे. वैद्यकीय तपासणीनंतर लवकरच संयुक्त चौकशी सुरू होईल. पुढील तपशील पुढे येतील," असे काश्मीरचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (ADGP) विजय कुमार यांनी ट्विटमध्ये सांगितले. बेपत्ता झालेले लष्कर जवानाला शोधण्यासाठी पोलीसांनी आणि लष्करांनी शोधमोहिम सुरु केली होती.
#Missing Army jawan has been recovered by Kulgam Police. Joint #interrogation will start shortly after medical checkup. Further details shall follow: ADGP Kashmir@JmuKmrPolice
— Kashmir Zone Police (@KashmirPolice) August 3, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 04, 2023 07:31 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

