Mine Blast in Jammu and Kashmir: जम्मूच्या नौशेरा येथे नियंत्रण रेषेजवळ सुरूंग स्फोट; 6 जवान जखमी

जम्मू आणि काश्मीरच्या नौशेरा सेक्टरमध्ये मंगळवारी धक्कादायक घटना घडली. नियमित गस्त घालणाऱ्या सैनिकांच्या एका पथकाला माईन ब्लास्टला सामोर जाव लागल. यामध्ये अनेक सैनिक जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. जखमी जवांनांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Fire | Pixabay.com

Rajouri Mine Blast: जम्मू आणि काश्मीरमधील (Jammu and Kashmir) राजौरी येथील नौशेरा (Naushera) सेक्टरमध्ये मंगळवारी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ झालेल्या सुरूंग स्फोटात किमान लष्कराचे जवान जखमी (Indian Army Jawan) झाल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, गोरखा रायफल्सच्या सैनिकांची एक तुकडी राजौरीतील खांबा किल्ल्याजवळ सकाळी 10.45 वाजता नियमित गस्त घालत असताना अपघाती स्फोट (Mine Blast) झाला. जखमी सैनिकांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. घुसखोरीविरोधी अडथळा प्रणालीचा भाग म्हणून नियंत्रण रेषेजवळील पुढच्या भागात भूसुरुंग बसवण्यात आले आहेत. जे कधीकधी पावसामुळे वाहून जातात आणि त्यामुळे असे अपघात होतात. (Liquor, Meat Ban in Madhya Pradesh: धार्मिक स्थळांजवळील परिसरात दारू आणि मांस बंदी; मध्य प्रदेश सरकार मोठा निर्णय घेण्याच्या विचारात)

 जम्मूच्या नौशेरा येथे नियंत्रण रेषेजवळ सुरूंग स्फोट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now