Stock Market: शेअर बाजारात विक्रम! सेन्सेक्स प्रथमच 79,000 पार, तर निफ्टी 24,000 च्या जवळ

शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सेन्सेक्सने पहिल्यांदा विक्रमी पातळी गाठली आहे. सेन्सेक्सने आज 79000 अंकांवर गेला आहे.

Indian Stock Market | | (Photo Credits: ANI)

Stock Market: शेअर बाजारात सेन्सेक्सने आज 79000 अंकांची पातळी गाठली आहे. तर NSE चा निफ्टी 23,881.55 अंकांनी उघडला आहे. सकाळपासूनच बाजारात मर्यादित प्रमाणात व्यवहार होत होते. सेन्सेक्सच्या शेअर्स पाहिले तर त्यातील 30 शेअर्सपैकी 12 शेअर्स वाढीसह आणि 18 शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत. अल्ट्राटेक सिमेंट त्याच्या मोठ्या सिमेंट डीलच्या आधारे मार्केटमध्ये टॉप गेनर बनली. त्यानंतर JSW स्टीलचा क्रमांक लागतो. गुरुवारी सुरुवातीच्या व्यापारात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 8 पैशांनी 83.49 वर वाढला, कारण कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या. ब्रेंट क्रूड ऑइल फ्युचर्स 28 सेंट्स म्हणजेच 0.3% घसरून $84.97 प्रति बॅरल झाले. जपानचा निक्केई शेअर सरासरी गुरुवारी 1% घसरला. तर, हाँगकाँगचा हँग सेंग देखील सुमारे 2% खाली व्यवहार करत होता.

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now