Massive Fire In Chennai: चेन्नईत साबणाच्या गोडाऊनला भीषण आग; 100 कोटी रुपयांच्या मालाचे नुकसान
तामिळनाडू येथील चेन्नई शहरात एका साबणच्या गोदामाला आग लागली आहे.चेन्नई शहरातील मनाली येथील वायकाडू भागात आग लागल्याची माहिती मिळाली आहे.
Massive Fire In Chennai: तामिळनाडू येथील चेन्नई शहरात एका साबणच्या गोदामाला आग लागली आहे.चेन्नई शहरातील मनाली येथील वायकाडू भागात आग लागल्याची माहिती मिळाली आहे. या गोदामाला भीषण आग लागल्यामुळे 100 कोटी रुपयांच्या मालाचे नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग विझवण्याचे शर्तीचे काम सुरु आहे. या घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झाली नाही. परिसरात जवळच इंडियन ऑईल कंपनीचा गॅस सिलिंडरचा कारखाना असून आग तेथे पसरण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)