Mahakumbh Mela Fire: महाकुंभमध्ये अग्नीतांडव! सेक्टर 8 मध्ये भीषण आग, अग्निशमन दलाची टीम घटनास्थळी दाखल

प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभ 2025 दरम्यान आज पुन्हा एकदा आगीची घटना समोर आली आहे. कुंभमेळ्यातील सेक्टर 8 मधील बजरंग दास मार्गावर आग भडकली.

fire (img: Pixabay)

Mahakumbh Mela Fire: प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभ 2025 (Mahakumbh 2025) दरम्यान पुन्हा एकदा आगीची घटना घडली आहे. कुंभमेळ्यातील सेक्टर 8 मधील बजरंग दास मार्गावर एका छावणीत अचानक आग लागली. ज्यामुळे तंबू आणि इतर वस्तू जळून खाक झाल्या. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाची टीम घटनास्थळी पोहोचली आणि त्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी तातडीने प्रयत्न सुरू केले आहेत. या जाळपोळीच्या घटनेमुळे कुंभमेळामध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. परंतु दिलासा देणारी बाब म्हणजे अग्निशमन दलाच्या पथकाने वेळीच आग आटोक्यात आणली आणि मोठी दुर्घटना टाळली.

सेक्टर 8 मध्ये भीषण आग

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now