Sudden Death in Rajasthan: कौटुंबिक कार्यक्रमात नाचताना ह्रदयविकाराच्या झटक्याने व्यक्तीचा मृत्यू, घटना कॅमेऱ्यात कैद (Watch Video)

कौटुंबित कार्यक्रमात नाचताना एका तरुणाचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ही घटना राजस्थान येथील भैंसलाना गावात घडली. मन्ना लाल जाखड असं मृताचे नाव आहे. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

Sudden Death in Rajasthan: PC TW

Sudden Death in Rajasthan: कौटुंबित कार्यक्रमात नाचताना एका तरुणाचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ही घटना राजस्थान येथील भैंसलाना गावात घडली. मन्ना लाल जाखड असं मृताचे नाव आहे. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मन्ना हे कार्यक्रमात नाचताना दिसत आहे. अचानक नाचता, नाचता ते जमिनीवर कोसळले. कुटुंबियांनी त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले. परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. डॉक्टरांनी त्यांना ह्रदयविकाराचा झटका आल्याचे सांगितले. या घटनेनंतर कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. मन्ना हे जोधपूर येथील सराकरी शाळेत शिक्षक म्हणून कामाला होते. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. (हेही वाचा- क्रिकेट खेळताना हृदय विकाराचा झटका आल्याने तरुणाचा मृत्यू, संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement