Love Brain Disease: 'लव्ह ब्रेन डिसऑर्डर' मुळे गर्लफ्रेंड तिच्या प्रियकराला करत होती दिवसाला 100 हून अधिक कॉल
दिवसातून 100 पेक्षा जास्त वेळा तिच्या प्रियकराला कॉल करून त्रास देत होती. चिंता, नैराश्य आणि बायपोलर डिसऑर्डर यांसारख्या मानसिक आजाराशी त्याचा संबंध असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
Love Brain Disease: एका 18 वर्षीय चिनी तरुणीला 'लव्ह ब्रेन डिसीज' या नवीन आजाराने ग्रासले आहे. दिवसातून 100 पेक्षा जास्त वेळा तिच्या प्रियकराला कॉल करून त्रास देत होती. चिंता, नैराश्य आणि बायपोलर डिसऑर्डर यांसारख्या मानसिक आजाराशी त्याचा संबंध असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. असे मानले जाते की, बालपणात त्यांच्या पालकांशी निरोगी संबंध नसलेल्या लोकांमध्ये हा आजार होण्याची शक्यता जास्त असते. 'साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट'ने प्रेयसीच्या मानसिक वागणुकीमुळे तिचा प्रियकर कंटाळल्याचे वृत्त दिले आहे. प्रेयसीमुळे त्रासलेल्या मुलालाही पोलिसांची मदत घ्यावी लागली.
पाहा पोस्ट:
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)