Lok Sabha Elections 2024: तब्बल 238 वेळा हरूनही मानली नाही हार; तामिळनाडूचे K. Padmarajan पुन्हा एकदा रिंगणात उतरणार, लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले नाव
पद्मराजन. ते तामिळनाडूतील मेत्तूर येथे टायर दुरुस्तीचे छोटेसे दुकान चालवतात. 65 वर्षीय पद्मराजन तब्बल 238 वेळा निवडणुकीत पराभूत झाले आहेत, हा एक नवा जागतिक विक्रम मानला जात आहे.
Election King K. Padmarajan: सर्वसाधारणपणे पराभव कोणालाच आवडत नाही. निवडणुकीमधील पराभव तर अनेक मोठे-मोठे लोक पचवू शकत नाहीत. मात्र एक व्यक्ती अशी आहे की, ज्यांनी निवडणुकीत पराभवाचा नवा विक्रम रचूनही पुन्हा एकदा निवडणूक लढवणार आहेत. ही व्यक्ती आहे तामिळनाडूचे के. पद्मराजन. ते तामिळनाडूतील मेत्तूर येथे टायर दुरुस्तीचे छोटेसे दुकान चालवतात. 65 वर्षीय पद्मराजन तब्बल 238 वेळा निवडणुकीत पराभूत झाले आहेत, हा एक नवा जागतिक विक्रम मानला जात आहे. असे असूनही त्यांनी हिंमत गमावली नाही आणि पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. एएफपीच्या वृत्तानुसार, पद्मराजन यांनी 1988 मध्ये पहिल्यांदा मेत्तूरमधून निवडणूक लढवली होती. तेव्हापासून त्यांनी त्यांच्या आयुष्यात स्थानिक निवडणुकांपासून अध्यक्षपदापर्यंत 238 वेळा निवडणूक लढवली, पण प्रत्येक वेळी त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. पद्मराजन यांचे नाव लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये भारतातील सर्वात अयशस्वी उमेदवार म्हणून नोंदवले गेले आहे. (हेही वाचा: Savitri Jindal Quits Congress, Joins BJP: काँग्रेसला आणखी एक झटका! देशातील सर्वात श्रीमंत महिला सावित्री जिंदाल यांनी सोडली साथ, भाजपमध्ये केला प्रवेश)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)