Kullu: पार्वती नदीने केले रौद्ररूप धारण, नागरिकांना नद्यांपासून दूर राहण्याचे आवाहन
सततच्या पावसामुळे डोंगराला तडे जात आहेत. अनेक महामार्गांचे नुकसान झाले आहे. मुसळधार पावसामुळे हिमाचलमधील मोठ्या नद्यांसह सर्वच लहान-मोठ्या नद्यांना पूर आला आहे. दरम्यान, कुल्लूच्या पार्वती नदीचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे.
Kullu: हिमाचल प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. सततच्या पावसामुळे डोंगराला तडे जात आहेत. अनेक महामार्गांचे नुकसान झाले आहे. मुसळधार पावसामुळे हिमाचलमधील मोठ्या नद्यांसह सर्वच लहान-मोठ्या नद्यांना पूर आला आहे. दरम्यान, कुल्लूच्या पार्वती नदीचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. मणिकरण खोऱ्यातील मलाणा भागात ढगफुटीमुळे पार्वती नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. नदीने भयानक रूप धारण केले आहे. प्रशासनाने लोकांना नद्यांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे.
पाहा पोस्ट: