Kalicharan Maharaj Arrested: कालीचरण महाराजांना रायपूर पोलिसांकडून अटक, धर्म संसदमध्ये महात्मा गांधींचा अवमान केल्याप्रकरणी घेतलं ताब्यात
छत्तीसगडमधील रायपूर पोलिसांनी कालीचरण महाराज यांना मध्य प्रदेशातील खजुराहो येथून ताब्यात घेतलं आहे.
छत्तीसगडमधील रायपूर पोलिसांनी कालीचरण महाराज यांना मध्य प्रदेशातील खजुराहो येथून ताब्यात घेतलं आहे. त्यांना धर्म संसदमध्ये महात्मा गांधींचा अवमान करणाऱ्या प्रक्षोभक भाषणासाठी अटक केली आहे. त्यांच्याविरुद्ध रायपूरच्या टिकरापारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. कालीचरण महाराज मध्य प्रदेशातील खजुराहोपासून 25 किमी अंतरावर असलेल्या बागेश्वर धामजवळ भाड्याच्या घरात राहत होते. आज पहाटे 4 वाजता रायपूर पोलिसांनी त्यांना अटक केली. सायंकाळी उशिरापर्यंत पोलिसांचे पथक आरोपीसह रायपूरला पोहोचेल, असे एसपी रायपूर प्रशांत अग्रवाल यांनी सांगितले.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)