Moon Viewed By Chandrayaan 3: अप्रतिम! चांद्रयान-3 ने पाठवला चंद्राचा पहिला व्हिडिओ, तुम्हीही पाहू शकता हे अप्रतिम दृश्य (Watch Video)
इस्रोने एक व्हिडिओ शेअर केला आणि म्हटले, "5 ऑगस्ट 2023 रोजी चंद्राच्या कक्षेत प्रवेश (LOI) दरम्यान Chandrayaan3 अंतराळयानाने पाहिलेला चंद्र."
चांद्रयान-3 चंद्राच्या जवळ पोहोचले आहे आणि यशस्वीरित्या चंद्राच्या कक्षेत ठेवण्यात आले आहे. 23 ऑगस्टला उतरण्याची शक्यता आहे. 5 ऑगस्ट रोजी चांद्रयान 3 ने चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला, त्या दरम्यान त्याने चंद्राचा व्हिडिओ बनवला. चांद्रयानाने अवकाशातून पहिला व्हिडिओ पाठवला आहे, ज्यामध्ये अप्रतिम दृश्य दिसले. चांद्रयान 3 चंद्राच्या कक्षेत कसे प्रवेश करत आहे हे व्हिडिओमध्ये दिसत आहे. 14 जुलै रोजी प्रक्षेपण केल्यानंतर चांद्रयान-3 ने शुक्रवारपर्यंत दोन तृतीयांश अंतर कापले होते. यावेळी चांद्रयान-3 चंद्राभोवती प्रचंड वेगाने प्रदक्षिणा घालत आहे. जर सर्व काही ठीक झाले तर 23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर चांद्रयान-3 चे सॉफ्ट लँडिंग केले जाईल.
पहा व्हिडिओ
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)