Indians Spent Over 5000 cr On Cosmetics: भारतीयांनी गेल्या सहा महिन्यांत सौंदर्यप्रसाधनांवर 5,000 कोटी रुपये केले खर्च

ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही प्रकारच्या मेकअप विक्रीमध्ये नोकरी करणार्‍या महिला सर्वात जास्त योगदान देतात

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo credit : TechRasa)

गेल्या सहा महिन्यांत, लिपस्टिक आणि नेलपॉलिशपासून ते आयलाइनरपर्यंतच्या 100 दशलक्ष कॉस्मेटिक वस्तू विकल्या गेल्या आहेत, ज्यातून 5,000 कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे, यापैकी जवळपास 40 टक्के खरेदी ऑनलाइन झाली आहे. भारतीय ग्राहकांनी सहा महिन्यांच्या कालावधीत रंगीत सौंदर्यप्रसाधनांवर सरासरी 1,214 रुपये खर्च करतात. एकूण विक्रीमध्ये लिपस्टीकच्या उत्पादनांचे वर्चस्व आहे, ज्याचा वाटा 38 टक्के आहे, त्यानंतर नेल उत्पादन आहेत, जे भारतीय खरेदीदारांमधील सौंदर्य खरेदीचे वैविध्य दर्शवितात. एका अभ्यासानुसार सौंदर्यप्रसाधनांच्या बाजारपेठेत काम करणाऱ्या महिलांच्या वाढत्या मागणी समोर आणली आहे. ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही प्रकारच्या मेकअप विक्रीमध्ये नोकरी करणार्‍या महिला सर्वात जास्त योगदान देतात, या उत्पादनांवर खर्च केलेल्या एकूण सरासरीच्या तुलनेत सौंदर्य उत्पादनांवर 1.6 पट जास्त खर्च करतात.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)