BMC Bharti 2023: बीएमसी मध्ये सहायक कायदा अधिकारी पदावर होणार नोकरभरती; 24 ऑगस्ट पर्यंत portal.mcgm.gov.in वर करा अर्ज
सहायक कायदा अधिकारी व सहायक कायदा अधिकारी (श्रेणी - २) या पदाची सरळसेवा भरती बीएमसीकडून जाहीर करण्यात आली आहे.
बीएमसी मध्ये सहायक कायदा अधिकारी पदावर नोकरभरती होणार आहे. आजपासून त्यासाठी अर्ज दाखल करण्यास सुरूवात झाली असून इच्छुक उमेद्वार 24 ऑगस्ट पर्यंत portal.mcgm.gov.in वर अर्ज दाखल करू शकतात. एकूण 49 जागांवर ही नोकरभरती होणार आहे. या पदांसाठी अर्ज दाखल करणार्या उमेदवाराला दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाच्या कामकाजाची माहिती असणं आवश्यक आहे. दरम्यान या नोकरभरतीसाठी आवश्यक पात्रता निकष, निवडा चाचणी, वयोमर्यादा, पगार या सार्याची सविस्तर माहिती बीएमसीने जारी नोटिफिकेशन मध्ये दिली आहे.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)