बनावट AK-47 रायफलसोबत रील बनवणाऱ्या इन्फ्ल्यूएंसरला बेंगळुरूमध्ये अटक

बनावट AK-47 रायफल आणि अंगरक्षकांसोबत पोज देऊन रील बनवणाऱ्या बेंगळुरूमधील 26 वर्षीय सोशल मीडिया इन्फुल्युएंसर व्यक्तीला शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत अटक करण्यात आली

बनावट AK-47 रायफल आणि अंगरक्षकांसोबत पोज देऊन रील बनवणाऱ्या बेंगळुरूमधील 26 वर्षीय सोशल मीडिया इन्फुल्युएंसर व्यक्तीला शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत अटक करण्यात आली, असे पोलिसांनी मंगळवारी सांगितले. लोकांमध्ये दहशत निर्माण केल्याच्या आरोपावरून कोठनूर पोलिसांनी अरुण कटारे याला अटक केली. पोलिसांनी कटारेच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले होते आणि कोणीतरी एके-47 घेऊन फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी कटारे याला ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीनंतर पोलिसांनी कटारे याच्याविरुद्ध बनावट बंदुकीने दहशत निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्याला शस्त्र कायदा आणि आयपीसीच्या कलम 290 (आता भारतीय न्याय संहिता) अंतर्गत अटक केली.

पाहा पोस्ट -