गोवा मुक्ती दिनानिमित्त स्वदेशी युद्धनौका 'मोरमुगाव'ची चाचणी, पुढील वर्षी भारतीय नौदलात होणार दाखल

भारतीय नौदलाचे प्रवक्ते कमांडर विवेक मधवाल म्हणाले की, आज देश पोर्तुगीज राजवटीपासून गोव्याच्या स्वातंत्र्याची 60 वर्षे साजरी करत आहे आणि कदाचित ही युद्धनौका उतरण्यासाठी 19 डिसेंबर ही सर्वोत्तम तारीख आहे.

Mormugao (Photo Credit - Twitter)

गोवा मुक्ती दिनानिमित्त (Goa Liberation Day) भारतीय नौदलाचे (Indian Navy) दुसरे स्वदेशी विनाशक 'मोरमुगाव' (Mormugao) रविवारी प्रथमच समुद्रात चाचणीसाठी सोडण्यात आले. ही स्वदेशी युद्धनौका 2022 च्या मध्यात नौदलाकडे सुपूर्द केली जाईल. भारतीय नौदलाचे प्रवक्ते कमांडर विवेक मधवाल म्हणाले की, आज देश पोर्तुगीज राजवटीपासून गोव्याच्या स्वातंत्र्याची 60 वर्षे साजरी करत आहे आणि कदाचित ही युद्धनौका उतरण्यासाठी 19 डिसेंबर ही सर्वोत्तम तारीख आहे.

Tweet