PM Modi Inaugurate RRTS Corridor: देशाला मिळाली पहिल्या RRTS ची भेट, PM मोदींनी केलं उद्घाटन, मेरठहून 60 मिनिटांत दिल्लीला पोहोचणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साहिबााबाद ते दुहाई डेपोला जोडणाऱ्या रॅपिड-एक्स ट्रेनला हिरवी झेंडी दाखवून भारतात प्रादेशिक रॅपिड ट्रान्झिट सिस्टम (RRTS) लाँच केले. ही भारतातील पहिली रॅपिड-एक्स ट्रेन आहे जी नमो भारत म्हणून ओळखली जाईल.

PM Modi Inaugurate RRTS Corridor (PC - Twitter/PTI)

PM Modi Inaugurate RRTS Corridor: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी देशातील पहिल्या प्रादेशिक रॅपिड ट्रान्झिट सिस्टमचे उद्घाटन केले. सध्या या ट्रेनच्या प्राधान्य विभागाची लांबी 17 किलोमीटर आहे. यावेळी सीएम योगी, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदी बेन पटेल, भाजप प्रदेशाध्यक्ष भूपेंद्र चौबे आणि केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साहिबााबाद ते दुहाई डेपोला जोडणाऱ्या रॅपिड-एक्स ट्रेनला हिरवी झेंडी दाखवून भारतात प्रादेशिक रॅपिड ट्रान्झिट सिस्टम (RRTS) लाँच केले. ही भारतातील पहिली रॅपिड-एक्स ट्रेन आहे जी नमो भारत म्हणून ओळखली जाईल.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement