Gyanvapi Mosque Survey:'शिवलिंग सापडलेली जागा सील करा', कोर्टाने डीएम, सीआरपीएफला दिले आदेश, वजूवरही बंदी

वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीत शिवलिंग मिळाल्याच्या दाव्यानंतर न्यायालयाने ती जागा सील करण्याचे आदेश दिले आहेत.

Gyanvapi Mosque Survey:वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीत शिवलिंग मिळाल्याच्या दाव्यानंतर न्यायालयाने ती जागा सील करण्याचे आदेश दिले आहेत. वाराणसी कोर्टाने डीएमला आदेश दिले आहेत की, ज्या ठिकाणी शिवलिंग प्राप्त झाले ते तात्काळ सील करावे आणि कोणत्याही व्यक्तीला तेथे जाऊ देऊ नये. त्याची जबाबदारी जिल्हा प्रशासन आणि सीआरपीएफकडे सोपवण्यात आली आहे. वाराणसी कोर्टाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, 'जिल्हा अधिकारी, पोलिस आयुक्त आणि सीआरपीएफ कमांडंरला शिवलिंग सापडलेल्या जागेचे संरक्षण करण्याचे आदेश देण्यात आला आहे की वरील सर्व अधिकारी सील केलेल्या ठिकाणाच्या संरक्षणासाठी आणि सुरक्षेसाठी वैयक्तिकरित्या जबाबदार असतील. काही अनुचित घडल्यास याचा विचार केला जाणार आहे. हिंदूंच्या म्हणण्यानुसार, वजूखाण्याचे पाणी काढल्यावर सर्वांनी आनंद व्यक्त केला, कारण तेथे 12.8 फूट व्यासाचे शिवलिंग होते.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now