Bomb Threat: गुरुग्रामच्या ॲम्बियन्स मॉल आणि नोएडाच्या DLF मॉलमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी, घटनास्थळी पोलिस उपस्थित (पहा व्हिडिओ)

उत्तर प्रदेशातील नोएडा शहरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. नोएडा सेक्टर 18 मध्ये असलेल्या DLF मॉलला बॉम्बची धमकी देण्यात आल्याचे वृत्त आहे. यासोबतच गुरुग्रामच्या ॲम्बियन्स मॉललाही बॉम्बची धमकी देण्यात आली आहे.

Photo Credit: X

Bomb Threat: उत्तर प्रदेशातील नोएडा शहरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. नोएडा सेक्टर 18 मध्ये असलेल्या DLF मॉलला बॉम्बची धमकी देण्यात आल्याचे वृत्त आहे. यासोबतच गुरुग्रामच्या ॲम्बियन्स मॉललाही बॉम्बची धमकी देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा धमकीचा ईमेल शनिवारी सकाळी मॉल व्यवस्थापनाला मिळाला.पोलिसांना ही माहिती देण्यात आल्याने दोन्ही मॉल रिकामे करण्यात आले आहेत. पोलीस, बॉम्बशोधक पथक, श्वान पथक घटनास्थळी हजर असून मॉलच्या प्रत्येक कानाकोपऱ्याचा शोध घेतला जात आहे. सुरक्षेच्या कारणास्तव मॉलच्या आजूबाजूचा परिसरही रिकामा करण्यात आला आहे. ट्विटरवर @SachinGuptaUP या हँडलवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. हेही वाचा: Mumbai Hospital Bomb Threat: मीरा रोड येथील हॉस्पिटलमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी, बॉम्बशोधक पथक आणि श्वान पथक घटनास्थळी दाखल

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now