Kolkata Factory Fire: कोलकत्ता येथील धापा परिसरातील इंजिन ऑईल कारखान्याला आग, घटनास्थळी बचाव कार्य सुरु

आगीची माहिती मिळताच, अग्निशमनदल घटनास्थळी दाखल झाले आहे.

kolkatta Fire PC TW

Kolkata Factory Fire: पश्चिम बंगाल येथील कोलकत्ता येथील धापा परिसरातील इंजिन ऑईल कारखान्याला आग लागल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आगीची माहिती मिळताच, अग्निशमनदल घटनास्थळी दाखल झाले आहे. कारखान्याला आग लागल्याचा व्हिडिओ एएनआय या वृत्तसंस्थेने शेअर केला आहे. ही आग नेमकी कश्याने लागली याचा शोध घेण्य़ात येत आहे. आगीमुळे परिसरात धुरांचे लोट पसरले आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरु आहे. कारखान्याला आग लागल्याने कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. (हेही वाचा- ठाणे येथील गोखले मार्गावरील अर्जुन टॉवरला भीषण आग (Watch Video)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)