Bengaluru Explosion: बेंगळूरु येथे रामेश्वरम कॅफेत स्फोट, 4 जण गंभीर जखमी, आग विझवण्याचे काम सुरु

बेंगळुरू शहरात प्रसिध्द रामेश्वरम कॅफेमध्ये शुक्रवारी दुपारी स्फोट झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Bengaluru Blast PC TWitter

Bengaluru Explosion: बेंगळुरू शहरात प्रसिध्द रामेश्वरम कॅफेमध्ये शुक्रवारी दुपारी स्फोट झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अचानक झालेल्या या स्फोटामुळे कॅमेमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण झाला आहे. एचएएल पोलिस स्टेशन अंतर्गत कुंडलहल्ली येथील रामेश्वरम कॅफमध्ये दुर्घटना घडली. माहितीनुसार, कॅफेमध्ये बॅगेत ठेवलेल्या एका संशयित वस्तूचा स्फोट झाला. स्फोट झाल्यानंतर कॅफेमध्ये उपस्थित ग्राहक जीव वाचवण्यासाठी बाहेर धावले. घटनेची माहिती पोलिस आणि अग्निशामक दलाला देण्यात आली. घटनास्थळी आग विझवण्याचे काम सुरु आहे. स्फोट कश्याने झाला याचा शोध सुरु आहे. या आगीत चार जण गंभीर जखमी झाले आहे अशी माहिती समोर आली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement