Encounter In Shopian: कुलगामनंतर शोपियानमध्ये चकमक; सुरक्षा दलांकडून शोध मोहीम सुरू

सध्या घटनास्थळी किती दहशतवादी लपले आहेत याची माहिती मिळालेली नाही, मात्र सुरक्षा दलांची शोधमोहीम सुरू आहे.

Encounter | (Photo Credits: Pixabay)

Encounter In Shopian: काश्मीर खोऱ्यातील शोपियान (Shopian) जिल्ह्यात सुरक्षा दलांकडून दहशतवाद्यांचा (Terrorists) खात्मा करण्यासाठी शोध मोहीम राबवली जात आहे. खरं तर, आज पहाटे शोपियानच्या छोटीगाम भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली. दहशतवादी जंगलात लपून बसले आहेत. त्याचवेळी त्यांना मारण्यासाठी सैनिकांनी गोळीबार सुरू केला. सध्या घटनास्थळी किती दहशतवादी लपले आहेत याची माहिती मिळालेली नाही, मात्र सुरक्षा दलांची शोधमोहीम सुरू आहे. काश्मीर झोन पोलिसांनी सांगितले की, ही चकमक शोपियानच्या छोटीगाम भागात झाली. पोलीस आणि लष्कराचे जवान मोर्चे सांभाळत असून दहशतवाद्यांवर गोळीबार करत आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)