Supreme Court refuses to reschedule NEET-PG 2024: सर्वोच्च न्यायालयाकडून नीट पीजी ची परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी फेटाळली; 11 ऑगस्टलाच होणार पेपर
23 जूनची परीक्षा आता 11 ऑगस्टला होत आहे.
सर्वोच्च न्यायालयाने आज (9 ऑगस्ट) नीट परीक्षा पुढे ढकलण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आता पूर्वनियोजित वेळेनुसार 11 ऑगस्ट दिवशीच परीक्षा होणार आहे. दिलेल्या परीक्षा केंद्रांवर पोहचणं अनेक विद्यार्थ्यांना कठीण असल्याचं सांगत या परीक्षेला पुढे ढकलण्याची मागणी झाली होती पण ती फेटाळण्यात आली आहे. न्यायमूर्ती CJI DY Chandrachud,Justices, JB Pardiwala, Manoj Misra यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली आहे. त्यांनी आता 11 ऑगस्टची परीक्षा पुढे ढकलण्यास नकार दिला आहे. या परीक्षेची अॅडमीट कार्ड देखील जारी करण्यात आली आहेत.
नीट परीक्षा 11 ऑगस्टलाच होणार
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)