SSC GD Constable Exam 2023: आता हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त 13 प्रादेशिक भाषांमध्ये घेण्यात येणार कॉन्स्टेबल (GD) CAPF परीक्षा
CAPF मध्ये स्थानिक तरुणांच्या सहभागाला चालना देईल, हा यामागचा उद्देश आहे.
SSC GD Constable CAPF Exam 2023: गृह मंत्रालयाने कॉन्स्टेबल (GD) CAPF परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त 13 प्रादेशिक भाषांमध्ये कॉन्स्टेबल (GD) CAPF परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे. म्हणजेचं यापुढे उमेदवार 13 प्रादेशिक भाषांपैकी कोणत्याही एका भाषेत परीक्षा देऊ शकता. CAPF मध्ये स्थानिक तरुणांच्या सहभागाला चालना देईल, हा यामागचा उद्देश आहे. गृह मंत्रालयाच्या या निर्णयामुळे उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. (हेही वाचा - Government Jobs 2023: मध्य प्रदेश मध्ये 1 लाख सरकारी नोकरी मध्ये 60 हजार पेक्षा जास्त शिक्षक नियुक्तीचं लक्ष्य; PM Narendra Modi यांच्याकडून कौतुकाची थाप)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)