Maharashtra Colleges: 1 फेब्रुवारी 2022 पासून राज्यातील महाविद्यालये ऑफलाईन सुरु होणार; लसीचे दोन्ही डोस घेतलेले असणे आवश्यक

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा काही दिवस बंद होत्या

Uday Samant | (File Photo)

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा काही दिवस बंद होत्या. त्यानंतर कोरोना आणि ओमायक्रॉनच्या रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण, कमी मृत्यूदर आणि घरीच रुग्ण बरे होण्याचे प्रमाण पाहता सोमवारपासून पुन्हा शाळा सुरु झाल्या आहेत. आता दिनांक 1 फेब्रुवारी 2022 पासून राज्यातील महाविद्यालय ऑफलाईन सुरू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने उच्च व तंत्रशिक्षण विभागाने घेतला आहे. महाविद्यालयात येताना विध्यार्थ्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतलेले असणे आवश्यक आहे. उच्च शिक्षण आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी याबाबत माहिती दिली.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement