JEE Main Exam 2022 Update: विद्यार्थ्यांच्या मागणीनंतर जेईई मेन परीक्षेच्या तारखा बदलल्या; जाणून घ्या नवीन वेळापत्रक

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) विद्यार्थ्यांची मागणी लक्षात घेऊन 2022 च्या JEE मुख्य परीक्षेच्या तारखा बदलल्या आहेत.

प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

21 एप्रिलपासून होणारी संयुक्त प्रवेश परीक्षा मुख्य परीक्षा (JEE Main Exam 2022) पुढे ढकलण्यात आली आहे. या परीक्षेच्या तारखेवरून गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. ही परीक्षा एप्रिलनंतर घेण्यात यावी आणि त्याचवेळी परीक्षेला बसण्यासाठी 2 ऐवजी 4 संधी द्याव्यात, अशी विद्यार्थ्यांची मागणी होती. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) विद्यार्थ्यांची मागणी लक्षात घेऊन 2022 च्या JEE मुख्य परीक्षेच्या तारखा बदलल्या आहेत.

नवीन तारखांनुसार, सत्र 1 ची परीक्षा आता 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27,28 आणि 29 जून 2022 रोजी होणार आहे. तर सत्र 2 ची परीक्षा 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29 आणि 30 जुलै 2022 रोजी होणार आहे. विद्यार्थ्यांना NTA ची अधिकृत वेबसाइट www.nta.ac.in किंवा JEE Main वेबसाइट jeemain.nta.nic.in वर वेळोवेळी भेट देत राहण्याचा सल्ला दिला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)