HSC Exams Timetable Update: बारावीच्या 5 आणि 7 मार्चचे पेपर पुढे ढकलले; जाणून घ्या नव्या तारखा
काल संगमनेर येथे महाराष्ट्र बोर्डाच्या इयत्ता 12 वी परीक्षेच्या विविध विषयांच्या प्रश्नपत्रिका घेऊन जाणाऱ्या ट्रकला आग लागली
महाराष्ट्रातील 12 वीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. महामंडळाने बारावीच्या परीक्षेच्या वेळापत्रकात बदल केले आहेत. 5 मार्चचे पेपर आता 5 एप्रिलला होणार आहेत. तर, 7 मार्चचे पेपर आता 7 एप्रिलला होणार आहेत. याची सर्व विद्यार्थी आणि पालकांनी नोंद घ्यावी अशी माहिती देण्यात आली आहे.
काल संगमनेर येथे महाराष्ट्र बोर्डाच्या इयत्ता 12 वी परीक्षेच्या विविध विषयांच्या प्रश्नपत्रिका घेऊन जाणाऱ्या ट्रकला आग लागली होती, या आगीत सर्व प्रश्नपत्रिका जळून खाक झाल्या. अधिकाऱ्यांनी सांगितले की, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे विभागाच्या प्रश्नपत्रिका मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात आणल्या जात असताना ट्रकला आग लागली. यामुळे भाषा विषयांचे पेपर पुढे ढकलण्यात आले आहेत.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)