Engineering Education in Marathi: 'इंजिनिअरिंगचे शिक्षण मराठीमधून दिल्यास अशा मुलांना पुढे कोणीही रोजगार देणार नाही'- Ajit Pawar
पुढील वर्षी जून महिन्यापासून अभियांत्रिकी अभ्यासक्रम मराठीत उपलब्ध होणार असल्याचे मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले होते.
केंद्र सरकारने उच्च शिक्षण हे मातृभाषेत देण्याचा घाट घातला आहे. नुकतेच पुढील वर्षी जून महिन्यापासून अभियांत्रिकी अभ्यासक्रम मराठीत उपलब्ध होणार असल्याचे मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले होते. आता आज अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रवादी नेते अजित पवार यांनी या निर्णयाविरोधात आवाज उठवला. अजित पवार म्हणाले, ‘आपल्याकडील, विशेषतः ग्रामीण भागातील मुलांना इंजिनिअरिंग केल्यानंतर जितके अस्खलित इंग्लिश यायला हवे तितके येत नाही. आपली मातृभाषा मराठी आलीच पाहिजे, परंतु इंजिनिअरिंगचे अभ्यासक्रम मराठीत केल्यास त्या मुलांना पुढे कोणीही रोजगार देणार नाही. यामुळे नव्या पिढीचे नुकसान होईल. यावर विचार करण्याची नितांत गरज आहे. रोजगारानिमित्त जगाच्या पाठीवर कुठेही जाताना फ्रेंच, जर्मन अशा अन्य भाषा येणे गरजेचे ठरते.’
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)