CBSE Board Exam Date Sheet 2025: सीबीएससी बोर्डाने जाहीर केल्या इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या परीक्षेच्या तारखा; पहा वेळापत्रक
सहसा बोर्ड नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस किंवा डिसेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात परीक्षेच्या तारखा घोषित करते. मात्र यावेळी बोर्डाने अचानक डेट शीट जाहीर करून सर्वांनाच चकित केले.
CBSE Board Exam Date Sheet 2025: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच सीबीएससीने 2025 मध्ये होणाऱ्या 10वी आणि 12वी बोर्ड परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. उमेदवार cbse.gov.in ला भेट देऊन तारीख पत्रक तपासू शकतात. सहसा बोर्ड नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस किंवा डिसेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात परीक्षेच्या तारखा घोषित करते. मात्र यावेळी बोर्डाने अचानक डेट शीट जाहीर करून सर्वांनाच चकित केले. वेळापत्रकानुसार 15 फेब्रुवारीपासून परीक्षा सुरू होणार आहेत. 10वीच्या परीक्षा 18 मार्चला संपणार आहेत, तर 12वीच्या परीक्षा 4 एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहेत. सीबीएससी बोर्ड परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी आणि विभागनिहाय गुण जाहीर करणार नाही. मागील ट्रेंडनुसार, बोर्ड टॉपर्सची यादी आणि विद्यार्थ्यांची विभागणी देखील जाहीर करणार नाही. बोर्ड गेल्या काही वर्षांपासून गुणवत्ता यादी जाहीर करत नाही. विद्यार्थ्यांमधील 'अस्वस्थ स्पर्धा' टाळणे हा या निर्णयामागचा उद्देश आहे. बोर्डाच्या निकालांची गुणवत्ता यादी जाहीर न करण्याचा निर्णय सर्वप्रथम महामारीमुळे उद्भवलेल्या लॉकडाऊन दरम्यान घेण्यात आला होता. सीबीएससी बोर्ड परीक्षा 2025 ला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी किमान 33 टक्के गुण मिळवावे लागतील. (हेही वाचा: Guidelines For Coaching Sector: कोचिंग क्षेत्रातील दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींना बसणार आळा; विद्यार्थ्यांची फसवणूक रोखण्यासाठी सरकारने जारी केली मार्गदर्शक तत्त्वे)
सीबीएससी बोर्डाने जाहीर केल्या इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या परीक्षेच्या तारखा-