CBSE Board 12th Class Result Declared: सीबीएसई बोर्डाचा 12 वीचा निकाल जाहीर; cbse.gov.in वर चेक करू शकाल

म्हणजेच यंदाच्या निकालात 0.65 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यंदा मुलांच्या तुलनेत मुलींचा निकाल 6.40 टक्के चांगला लागला आहे, असे बोर्डाचे म्हणणे आहे.

Students (प्रातिनिधिक प्रतिमा)

CBSE Board 12th Class Result: सीबीएसई बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक बाब आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने नुकताच 12वीचा निकाल जाहीर केला आहे. सीबीएसई बोर्ड 12वीचा निकाल 2024 अधिकृत वेबसाइट cbse.gov.in, cbse.nic.in, results.cbse.nic.in आणि cbseresults.nic.in वर तपासता येईल. यासह हा निकाल उमंग आणि डिजीलॉकरवर देखील तपासला जाऊ शकतो. यंदा एकूण 87.98 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गेल्या वर्षी (2023) एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी 87.33 होती. म्हणजेच यंदाच्या निकालात 0.65 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यंदा मुलांच्या तुलनेत मुलींचा निकाल 6.40 टक्के चांगला लागला आहे, असे बोर्डाचे म्हणणे आहे. (हेही वाचा: Unemployment Rate Decline In India: भारतातील बेरोजगारीच्या संख्येत लक्षणीय घट, सरकारी आकडेवारीतून दावा)

पहा पोस्ट-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)