Earthquake: दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के, 5.8 तीव्रतेचा भूकंप; अफगाणिस्तानच्या हिंदुकुशमध्ये होता भूकंपाचा केंद्रबिंदू

अफगाणिस्तानशिवाय भारत, पाकिस्तान, ताजिकिस्तानमध्येही पृथ्वी हादरली. आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार रात्री 9.31 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले.

Earthquake | (Image Credit - Ani Twitter)

Earthquake: शनिवारी रात्री दिल्ली-एनसीआरसह अनेक भागात भूकंपाचे धक्के जाणवले. प्राथमिक माहितीनुसार भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.8 इतकी होती. अफगाणिस्तानमधील हिंदुकुश येथे भूकंपाचा केंद्रबिंदू होता. अफगाणिस्तानशिवाय भारत, पाकिस्तान, ताजिकिस्तानमध्येही पृथ्वी हादरली. आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार रात्री 9.31 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. त्याचे केंद्र अफगाणिस्तानचे हिंदुकुश होते. त्याची लांबी 70.77 किमी आणि खोली 181 किमी होती. त्यामुळे जम्मू-काश्मीर, दिल्ली-एनसीआरपर्यंत भारतात हादरे बसले.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement