Rahul Gandhi Farm Video: छत्तीसगड दौऱ्यादरम्यान राहुल गांधींनी डोक्याला रुमाल बांधून केली भात कापणी, पहा व्हिडिओ
राहुल गांधी शेतात जाताच त्यांनी डोक्याला रुमाल बांधून भात कापणीला सुरुवात केली. त्यांनी शेतकऱ्यांशी भातशेती व इतर प्रश्नांवर चर्चा केली.
Rahul Gandhi Farm Video: छत्तीसगड दौऱ्यावर असलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज दुसऱ्या दिवशीही आपल्या निवडणूक रॅलीत भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. दरम्यान, राजनांदगाव आणि कावर्धा येथील निवडणूक रॅलींआधी राहुल आज रायपूरजवळील कटिया गावातील शेतात पोहोचले. त्यांनी कामगारांसोबत भात कापणी केली. राहुल गांधी शेतात जाताच त्यांनी डोक्याला रुमाल बांधून भात कापणीला सुरुवात केली. त्यांनी शेतकऱ्यांशी भातशेती व इतर प्रश्नांवर चर्चा केली. यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री भूपेश बघेल, उपमुख्यमंत्री टीएस सिंहदेव, विधानसभा अध्यक्ष चरणदास महंत, गृहराज्यमंत्री ताम्रध्वज साहू इत्यादी नेते उपस्थित होते.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
KL Rahul Milestone: टी-20 मध्ये केएल राहुलचा मोठा पराक्रम, किंग कोहलीचा विक्रम मोडला, रिझवानही राहिला मागे
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
UAE मध्ये महिलांनी मोकळे केस फिरवत का केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचं स्वागत? जाणून घ्या हे Al-Ayyala काय?
Advertisement
Advertisement
Advertisement