Doda Terror Attack: डोडा येथे दहशतवादी हल्ला; पाच जवान, एक पोलीस जखमी (Watch Video)
जम्मू-काश्मीरच्या डोडा जिल्ह्यात बुधवारी पहाटे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात लष्कराचे पाच जवान आणि एक पोलीस अधिकारी (एसपीओ) जखमी झाले आहेत.
Doda Terror Attack: जम्मू-काश्मीरच्या डोडा जिल्ह्यात बुधवारी पहाटे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात (Doda Terror Attack) लष्कराचे पाच जवान आणि एक विशेष पोलिस अधिकारी (एसपीओ) जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी मंगळवारी रात्री उशीरा सुमारे 1:45 वाजताच्या सुमारास डोडा येथील चत्तरगल्ला भागात लष्कर आणि स्थानिक पोलिसांच्या चौकीवर हल्ला केला होता. (हेही वाचा:Jammu and Kashmir Terrorist Attack: जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक; एका दहशतवाद्याचा खात्मा, सर्च ऑपरेशन सुरू )
पोस्ट पाहा-
दहशतवाद्यांकडून झालेल्या गोळीबारात लष्कराचे पाच जवान आणि एक एसपीओ जखमी झाले. सुरक्षा दलांनीही प्रत्युत्तर दिले. दहशतवाद्यांवर गोळीबार केला होता. त्याशिवाय, जखमी जवानांना भदेरवाह शहरातील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमी प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले आहे. सूत्रांनी सांगितले की, "परिसरात गोळीबार थांबला आहे, परंतु आता तेथे शोध मोहीम सुरू आहे".
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)