Karnataka Assembly Election 2023: विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या विजयानंतर DK Shivakumar झाले भावूक; पक्षाचे कार्यकर्ते आणि मतदारांचे मानले आभार, Watch Video

पक्षाच्या विजयावर बोलताना डिके शिवकुमार यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. निकालादरम्यान डीके शिवकुमार यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, हा अखंड कर्नाटकचा विजय आहे. मी राहुल गांधी, सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी यांना विजयाची खात्री दिली होती.

DK Shivakumar (PC - ANI/Twitter)

Karnataka Assembly Election 2023: कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा विजय जवळपास निश्चित झाला आहे. ट्रेंडमध्ये काँग्रेसला बहुमत मिळताना दिसत आहे. पक्ष 120 हून अधिक जागांवर पुढे आहे. कर्नाटकमधील काँग्रेसचा विजय पाहून काँग्रेसचे कर्नाटक अध्यक्ष डीके शिवकुमार भावूक झाले आहेत. पक्षाच्या विजयावर बोलताना डिके शिवकुमार यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. निकालादरम्यान डीके शिवकुमार यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, हा अखंड कर्नाटकचा विजय आहे. मी राहुल गांधी, सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी यांना विजयाची खात्री दिली होती. सोनिया गांधी तुरुंगात मला भेटायला आल्या तेव्हा मी विसरू शकत नाही, मी पदावर राहण्याऐवजी तुरुंगातच राहणे पसंत केले. पक्षाचा माझ्यावर विश्वास होता. दरम्यान शिवकुमार यांनी सिद्धरामय्या यांच्यासह सर्व काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले. (हेही वाचा - Karnataka Election Result 2023: कर्नाटकमध्ये सीमा भागात काँग्रेसची हवा, दोन ठिकाणी महाराष्ट्र एकीकरण समितीचा बुलंद आवाज)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now