Delhi Fire: दिल्लीच्या ओखला परिसरातील कपड्यांच्या गोदामाला भीषण आग, अग्निशमन दलाच्या 18 गाड्या घटनास्थळी दाखल

आज पहाटे 4 वाजताच्या दरम्यान गोदामाला लागलेल्या आगीनंतर परिसरात एकच खळबळ माजली आहे.

Delhi Fire: दिल्लीच्या ओखला परिसरातील कपड्यांच्या गोदामाला भीषण आग, अग्निशमन दलाच्या 18 गाड्या घटनास्थळी दाखल
Delhi Fire (Photo Credit: ANI)

दक्षिण दिल्लीत आगीच्या घटना वारंवार घडत आहेत. यातच दक्षिण दिल्लीतील ओखला फेज-2 परिसरातील कपड्यांच्या गोदामाला भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 18 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीचे कारण अद्याप समोर आले नाही. मात्र, आज पहाटे 4 वाजताच्या दरम्यान गोदामाला लागलेल्या आगीनंतर परिसरात एकच खळबळ माजली आहे. तर, या आगीत कोणताही जीवितहानी न झाल्याचे समजत आहे. ट्वीट-

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Oct 08, 2021 09:33 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).