Delhi Excise Policy Case: अरविंद केजरीवाल यांना दिल्ली न्यायालयाचा दिलासा; अबकारी धोरण प्रकरणी जामीन मंजूर
न्यायालयाने मुख्यमंत्री केजरीवाल यांना 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. यापूर्वी याच प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाच्या वतीने केजरीवाल यांना 8 वेळा हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आले होते.
Delhi Excise Policy Case: दिल्लीतील कथित दारू घोटाळा प्रकरणात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना शनिवारी न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. राऊस एव्हेन्यू कोर्टाने केजरीवाल यांचा जामीन अर्ज स्वीकारला असून त्यांना जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाने मुख्यमंत्री केजरीवाल यांना 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. यापूर्वी याच प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाच्या वतीने केजरीवाल यांना 8 वेळा हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आले होते. मात्र, केजरीवाल एकदाही हजर झाले नाहीत. हे प्रकरण आता न्यायालयात सुरू आहे.
[Excise policy case]
Delhi court grants bail to Arvind Kejriwal in ED's complaint case. @ArvindKejriwal @AamAadmiParty pic.twitter.com/sHUlVlsHZO
— Bar & Bench (@barandbench) March 16, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 16, 2024 10:39 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

