Karnataka Election Result 2023: चल्लाकेरे मतदारसंघात काँग्रेसचा विजय; 128 जागांवर आघाडी

काँग्रेसचे उमेदवार टी रघुमूर्ती यांनी चल्लाकेरे विधानसभा मतदारसंघातून भाजपचे अनिल कुमार आर आणि जेडीएसचे रवीश कुमार एम यांचा पराभव केला.

Karnataka Assembly Election Result (PC - Twitter)
Karnataka Election Result 2023: चल्लाकेरे मतदारसंघात काँग्रेसचा दणदणीत विजय झाला आहे. कर्नाटकमध्ये काँग्रेसने128 जागांवर आघाडी घेतली असून भाजप 67 जागांवर तर जनता दल (धर्मनिरपेक्ष) 22 जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेसचे उमेदवार टी रघुमूर्ती यांनी चल्लाकेरे विधानसभा मतदारसंघातून भाजपचे अनिल कुमार आर आणि जेडीएसचे रवीश कुमार एम यांचा पराभव केला. 2018 च्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत रघुमूर्ती यांनी JDS च्या रवीश कुमार यांचा 13539 मतांच्या फरकाने पराभव केला होता. (हेही वाचा - Karnataka Assembly Election Result 2023: कर्नाटकमध्ये काँग्रेसची जोरदार मुसंडी, भाजप पराभवाच्या छायेत, निकालाबद्दल जाणून घ्या महत्त्वाच्या घडामोडी)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now