Uttar Pradesh Video: टोल प्लाझा कर्मचारी आणि प्रवाशांमध्ये तुंबळ हाणामारी, यमुना एक्स्प्रेसवरील घटना कॅमेरात कैद
उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथील टोल प्लाझावर कर्मचारी आणि तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी झाली आहे.
Uttar Pradesh Video: उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथील टोल प्लाझावर कर्मचारी आणि तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी झाली आहे. जवळच असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही घटना यमुना द्रुतगती मार्गावरील जेवर टोल प्लाझा येथे घडली. त्यानंतर कार चालकाने पळून जाताना टोल कर्मचाऱ्यांच्या अंगावर कार नेली. यात कर्मचारी जमिनीवर पडले. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, कर्मचारी आणि प्रवाश्यामध्ये जोरात भांडण झाल्याचे दिसत आहे. ही घटना सोमवारी (12 फेब्रुवारी) सायंकाळी 4 च्या सुमारास जेवर पोलिस स्टेशन हद्दीतील जेवर टोल प्लाझा येथे घडली. टोल मागितल्यावर कर्मचारी आणि प्रवासीमध्ये भांडण चालू झाले.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement