Chhattisgarh Accident: छत्तीसगडमध्ये लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाडींवर काळाचा घाला, नववधू-वरासह 5 जणांचा दुर्दैवी अंत

छत्तीसगडमध्ये जांजगीर चांपा जिल्ह्यात अपघात झाला आहे. लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यांच्या कारचा घात झाला आहे.

Chhatishgarh Accident

Chhattisgarh Accident: छत्तीसगडमध्ये जांजगीर चांपा जिल्ह्यात अपघात झाला आहे. लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यांच्या कारचा घात झाला आहे. धक्कादायक म्हणजे या भीषण अपघातात नववधून आणि नवरदेवासह पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही दुर्घटना रविवारी सकाळच्या सुमारास घडली. अपघातानंतरचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भरधाव कारला ट्रकची धडक लागली. या धडकेत कार संपुर्ण चक्काचूर झाली आहे. ट्रक चालकाने धडक दिल्यानंतर घटनास्थळावरून फरार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहे. वऱ्हाडी मंडळी रामगडहून अकलतराच्या दिशेने निघाली कारने निघाले होते. दरम्यान पकरिया जंगल परिसरात ही दुर्घटना घडली.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement