Bharat Jodo Yatra: कडाक्याच्या थंडीत शर्ट न घातला 'जनेयू' परिधान केलेल्या मुलाचा भारत जोडो यात्रेत सहभाग; फोटो व्हायरल झाल्यानंतर राहुल गांधींवर उठली टीकेची झोड
तथापि, मुलाने चुकीच्या बाजूला पवित्र धागा घातला आहे. राहुल गांधी आणि या मुलाचा फोटो व्हायरल झाल्यानंतर ट्विटरवर राहुल गांधी यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.
काँग्रेस खासदार राहुल गांधी सध्या त्यांच्या 'भारत जोडो यात्रे'मुळे चर्चेत आहेत. त्यांचा पक्ष त्यांच्या ट्विटर हँडलवरून त्यांच्या रॅलीची छायाचित्रे पोस्ट करत आहे. पक्षाने नुकतेच एक छायाचित्र पोस्ट केले, ज्यासाठी काँग्रेस पक्षाच्या माजी राष्ट्रीय अध्यक्षांना क्रूरपणे ट्रोल करण्यात आले आहे. फोटोमध्ये राहुल गांधी 4 डिग्री तापमानात अत्यंत थंड वातावरणात फक्त धोतर आणि जनेयू (पवित्र धागा) घातलेल्या मुलाचा हात धरून चालताना दिसत आहेत. तथापि, मुलाने चुकीच्या बाजूला पवित्र धागा घातला आहे. राहुल गांधी आणि या मुलाचा फोटो व्हायरल झाल्यानंतर ट्विटरवर राहुल गांधी यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.
दरम्यान, यावरून भाजप नेते तजिंदर पाल सिंग बग्गा यांनी पुन्हा एकदा राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. थंडीत राहुल गांधी शर्टलेस मुलासोबत फिरत असल्याबद्दल बग्गा यांनी नाराजी व्यक्त केली आहे. बग्गा यांनी एक फोटो शेअर केला आहे. त्या चित्रात मुलाने फक्त धोतर आणि जनेयू घातलेले दिसत आहे. बग्गा यांनी राहुल गांधींचा मुलासोबतचा फोटो ट्विट करत लिहिले की, "4 डिग्री तापमानात केवळ एक निर्लज्ज माणूसच मुलाला राजकारणासाठी कपड्यांशिवाय फिरवू शकतो." राहुल गांधींच्या या फोटोवर अनेकजण टीका करत आहेत.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)