Indigo's Pune-Jodhpur Flight Receives Bomb Threat: इंडिगोच्या पुणे-जोधपूर फ्लाइटला बॉम्बची धमकी; जोधपूर विमानतळावर करण्यात आले आपत्कालीन लँडिंग
धमकी मिळाल्यानंतर विमानतळ अधिकाऱ्यांनी तत्काळ कारवाई केली आणि पुढील तपासणीसाठी विमानाला विमानतळाच्या एका निर्जन भागात नेले.
Indigo's Pune-Jodhpur Flight Receives Bomb Threat: पुण्याहून जोधपूरला जाणाऱ्या इंडिगो फ्लाइट 6E133 ला रविवारी दुपारी बॉम्बची धमकी मिळाली, ज्यामुळे फ्लाईटचे जोधपूर विमानतळावर (Jodhpur Airport) लँडिंग करण्यात आले. दुपारी 1:07 वाजता विमान सुरक्षितपणे उतरवण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, धमकी मिळाल्यानंतर विमानतळ अधिकाऱ्यांनी तत्काळ कारवाई केली आणि पुढील तपासणीसाठी विमानाला विमानतळाच्या एका निर्जन भागात नेले. त्यानंतर अग्निशमन दल, श्वानपथक, पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसह आपत्कालीन पथकेही तातडीने घटनास्थळी दाखल झाली. याशिवाय, सुरक्षेसाठी सुरक्षा कर्मचाऱ्यांकडून संपूर्ण विमानासह प्रवाशांच्या सामानाची कसून तपासणी केली जात आहे.
इंडिगोच्या पुणे-जोधपूर फ्लाइटला बॉम्बची धमकी -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)