Bakri Eid 2024: मध्य प्रदेशमध्ये बकऱ्यांना 50,000 ते 7.5 लाखांपर्यंतची बोली, बकरी ईदमुळे मोठ्या प्रमाणात दर वाढले (Watch Video)
मध्यप्रदेशमध्ये 50,000 ते 7.5 लाखांपर्यंत किमतीत बकऱ्या विकल्या जात आहेत.
Bakri Eid 2024: बकरी ईद(Bakri Eid)मुळे देशभरात बकऱ्यांच्या दरात प्रचंड वाढ(Goat prices increase) पहायला मिळत आहे. मध्यप्रदेशमध्ये सय्यद शहाब अली बकरी विक्रेत्याने 50,000 ते 7.5 लाखांपर्यंतच्या किमतीत बकऱ्या विकल्या जात असल्याचे सांगितले. मुंबई, पुणे, नागपूर, भागात बकरे विकल्याचे सय्यद म्हणाला. शान ए भोपाल मुंबईत 4 लाखांचा बकरा विकला. तर मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये 7.5 लाखांचा बकरा विकल्याचे त्याने म्हटले. रफ्तार नावाचा बकरा 7 लाखांना पुण्यात विकला गेला आहे. हा भारतातील सर्वात महाग बकरा विकल्याचे सय्यद यांनी म्हटले आहे. (हेही वाचा:Trendy Mehndi Design For This Bakri-Id 2024: बकरी ईद निमित्त काढा या ट्रेंडी मेहंदी डिझाईन्स, येथे पहा व्हिडिओ )
पोस्ट पाहा-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)