Monkeypox: केरळच्या कन्नूर जिल्ह्यात मंकीपॉक्सचा दुसरा रुग्ण आढळला

कन्नूर येथील 31 वर्षीय व्यक्तीवर सध्या परियाराम मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहेत, असे केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितले.

Monkeypox | Representative Image( Pic Credit-ANI)

भारतामध्ये केरळच्या कन्नूर जिल्ह्यात मंकीपॉक्सचा दुसरा रुग्ण आढळून आला आहे. कन्नूर येथील 31 वर्षीय व्यक्तीवर सध्या परियाराम मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहेत, असे केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितले. तसेच रुग्णाची प्रकृती समाधानकारक असल्याची नोंद आहे. त्याच्या जवळच्या लोकांवर पाळत ठेवण्यात आली आहे, मंत्री म्हणाले. तत्पूर्वी, गुरुवारी, 14 जुलै रोजी केरळमध्ये मंकीपॉक्सचा पहिला पुष्टी झालेला रुग्ण आढळला.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement