Air Quality: बिहारचे बेगुसराय जगातील सर्वात प्रदूषित शहर; दिल्लीतही पुन्हा हवेची गुणवत्ता खालावली

तर राजधानी दिल्लीत सर्वात खराब हवा असल्याच समोर आलं आहे.

Delhi Air Quality | (Photo Credits: x/ANI)

Air Quality : बिहारमधील बेगुसराय (Begusarai)हे जगातील सर्वात प्रदूषित शहर म्हणून समोर आले आहे. त्या खालोखाल दिल्लीतील (Delhi)हवेचा दर्जा खालावला आहे. नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या एका अहवालानुसार ही माहिती समोर आली आहे. 2023 मध्ये एक सर्वे करण्यात आला होता. ज्यात 134 देशांमधील हवेच्या गुणवत्तेचा (Air Quality) अभ्यास करण्यात आला. त्यात भारताला तिसरा सर्वात खराब हवेचा दर्जा मिळाला. पहिल्या क्रमांकावर बांगलादेश (79.9 मायक्रोग्राम प्रति घनमीटर) त्यानंतर पाकिस्तान (73.7 मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर) नंतर, भारताचा नंबर होता. स्विस संस्था IQ Air द्वारे जागतिक वायु गुणवत्ता अहवाल सादर करण्यात आला. बेगुसराय हे जागतिक स्तरावर सर्वात प्रदूषित शहर म्हणून उदयास आले आहे ज्यामध्ये सरासरी PM2.5 एकाग्रता 118.9 मायक्रोग्राम प्रति घनमीटर आहे. (हेही वाचा:Air quality in Mumbai: मुंबई मध्ये आज हवा गुणवत्ता निर्देशांक 'Moderate'स्तरावर! )