Punjab Road Accident: जम्मू - जालंधर राष्ट्रीय महामार्गावर अपघात, कार आणि ट्रकच्या धडकेत चार जणांचा मृत्यू
पंजाबमधील जम्मू - जालंधर राष्ट्रीय महामार्गावर कार आणि ट्रकमध्ये टक्कर झाल्याने भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.
Punjab Road Accident: पंजाबमधील जम्मू - जालंधर राष्ट्रीय महामार्गावर कार आणि ट्रकमध्ये टक्कर झाल्याने भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला तर 2 जण जखमी झाले. कारमध्ये पाच जण प्रवाशी होते. त्यापैकी 4 जणांचा जागीच मृत्यू झाला. जखमी लोकांना सिव्हील रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच, पोलिस अपघातस्थळी दाखल झाले.हा अपघात कसा झाला याचा तपास सुरु केला आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)