Humsafar Express Train Fire: गुजरातमधील वलसाडमध्ये अपघात, हमसफर एक्स्प्रेसला भीषण आग (Watch Video)

ट्रेन मुंबईहून अहमदाबादला जात होती. प्रवाशांना ट्रेनमधून खाली उतरवण्यात आले आहे. अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

वलसाडमध्ये हमसफर सुपरफास्ट एक्स्प्रेस ट्रेनला आग लागल्याची घटना समोर आली आहे. आग लागल्यानंतर ट्रेनमधून धुराचे लोट उठू लागले. ट्रेन मुंबईहून अहमदाबादला जात होती. प्रवाशांना ट्रेनमधून खाली उतरवण्यात आले आहे. अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. तिरुचिरापल्ली जंक्शन ते श्री गंगानगर जंक्शन या ट्रेन क्रमांक 22498 च्या पॉवर कार/ब्रेक व्हॅन कोचमध्ये आग आणि धूर दिसून आला. धुराचे लोट पाहून घबराट निर्माण झाली. शेजारील डब्यातील सर्व प्रवासी सुखरूप उतरले. यात कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement