Meerut: घराच्या बाहेरून सात वर्षाच्या मुलीचे अपहरण, घटनेचा Video व्हायरल, मेरठ येथील घटना

उत्तर प्रदेशातील मेरठ येथे एका अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मुलगी मेरठ येथील जल निगम येथील रहिवासी आहे.

Kidnnaping Photo Credit X

Meerut: उत्तर प्रदेशातील मेरठ येथे एका अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मुलगी मेरठ येथील जल निगम येथील रहिवासी आहे. मुलगी ७ वर्षाची आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, मुलगी शाळेच्या गणवेशात होती. तेवढ्यात एका कार चालकाने तिला बळजबरीने कारमध्ये बसवले.आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अपहरणाच्या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. मुलीच्या अपहरणांसदंर्भात पोलिसांना अद्याप कोणतीही माहिती मिळाली नाही. (हेही वाचा- नाशिकमध्ये साडेचार वर्षीय चिमुकलीचे अपहरण करून लैंगिक अत्याचार; संशयित आरोपीला अटक)

 मेरठ येथील अपहरणाचा व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now